चिमूर : 8 फरवरी बुधवारी चिमुर उपजिल्हा रुग्णालयातील सरकारी रुग्णवाहिका(एबुलेंस) काही कामासाठी ब्रह्मपुरी ला पाठवण्यात आली होती मात्र या गाडीवर नवीन चालक पाठविन्यात आले असून
सदर चालक ने माँगलगाव वरुण परत येत असताना खेमजई -भटाला (शेगाव) तालुका वरोरा येथील महिलाना पैशाच्या लालसेने चिमूर पर्यन्त बसवले प्रात्र माहितीनुसार गाडी चालक हा दारू पिउन असल्याची माहिती प्राप्त झाली असल्याने अदांजे सायकाळ ७:०० वाजेच्या सुमारात जाभूलघाट -मालेवाडा जवळ वाहन जोराने चालवत असताना त्याच्या तोल गेला व ती रुग्णवाहिका क्रमांक MH 34-A 7126 वाहन पलटी झाले
त्याच वेळी तिथुन येणार सुधीर मयककर या तरुणाने सामाजिक बाधिलकी जोपासत दुजाकी वाहणाने सर्व जख्मी महिलांना चिमुर येथे उपजिल्हा रुग्णालयात आणले पुढिल तपास चिमूर पोलीस करीत आहे
चिमूर :- आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमुर आणि ग्राम पंचायत कोलारा यांचे संयुक्त विद्यमाने ग्राम विकास मतदान जागृती युवा शक्ती या संकल्पनेवर राष्ट्रीय सेवा योजना ग्रामिण समाजकार्य श्रमसंस्कार विशेष शिबिर दि. २४ जाने . ते ३० जाने, कार्यक्रमाच्या समारोपीय प्रसंगी ग्राम विकासासाठी कोलारा हे गाव ३ वर्षासाठी शिबीर घेण्यास कटीबद्ध राहु असे प्रतिपादन डॉ. केदारसिंग रोटेले यांनी केले.ते पुढे म्हणाले की ग्रामाच्या विकासासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करू सुर्य हमेशा उगता रहे, सुर्य की रोशनी हमेशा बरकरार रहे, विद्यार्थी हमारा घडता रहे असे सांगुन महाविद्यालय नविन नविन कोर्सेस आणुन विद्यार्थ्यांचा विकास घडवेल विद्यार्थी हा लोकल टु ग्लोबल जाईल याकडे पुर्ण प्रयत्न करू आणि कोलारा गावचा विकास घडवु असे अध्यक्षीय भाषणातून मनोगत व्यक्त केले. डॉ. गजानन बन्सोड म्हणाले की समाजकार्य विद्यार्थी संपूर्ण भारतभर विविध क्षेत्रात आहेत. त्यांच्या माध्यमातुन गावचा विकास साधु असे ते बालले. कार्यकारी प्राचार्य डॉ. विठ्ठल ठावरी कला वाणिज्य महाविद्यालय भिसी यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुनांच्या विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबीर घेतल्या जाते. डॉ. विजय घरत सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी ३ वर्ष शिबीर या गावात घेण्यासाठी मी विद्यापीठ स्थरावर पर्यंत करेल. डॉ.आनंद किन्नाके यांच्या वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय चिमूर यांच्या मार्गदर्शना नुसार ३२२ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर डॉ. राठोड पशुवैद्यकीय अधिकारी व त्यांची टीम यांनी २३० गुरांची तपासणी केली, ग्राम स्वच्छता, मतदार जागृती अभियान यावर पथनाट्य तसेच मा. निशिकांत मेहरकुरे यांनी मार्गदर्शन केले. सामुदायिक ध्यान योगा प्रार्थना दररोज डॉ. दिवाकर कुमरे यांनी प्रत्याशिकाद्वारे शिबीरापर्थ्यांना करून दाखविले, सामुदायिक प्रार्थना दररोज डॉ. चंद्रभान खंगार कार्यक्रम अधिकारी रा. से.यो.यांच्या मार्गदर्शनात ग्रामस्थ सज्जनराव गेडाम, योगेश गेडाम, संतोष गेडाम, अमित उईके, यांच्या साथीने घेतल्या जात होती. वनउपजापासुन उद्योगाची यावर डॉ. अजय पिसे यांनी मार्गदर्शन केले, राष्ट्रसंताचे साहित्य यावर मा. राजु देवतळे आजिवन प्रचारक तथा केंद्रीय कार्यकारणी सदस्य गुरूकुंज मोझरी यांनी मार्गदर्शन केले तर प्रा. अशोकरावजी चरडे यांनी सामुदायिक प्रार्थनेच्या महत्वावर मार्गदर्शन केले. श्री. संजय पवार यांनी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी यावर मनोगत व्यक्त केले. शेतीसाठी जोडव्यवसाय मधुमख्खी पालन यावर मा. रमेश चौधी यांनी प्रात्याक्षिकाद्वारे याचे महत्व समजावुन सांगीतले, श्रमदान ग्रामस्वच्छता विद्यापिठ आपल्यादारी सर्वेक्षण तसेच दररोज सायंकाळी ८ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये श्री. उईके कु. धनश्री शेडामे, मेघा गेडाम, वैष्णवी गुडघे, ऋतुजा भजभुजे तसेच सर्व शिबीरातील यांनी सांस्कृतिक कार्यक्रमामधुन जनप्रबोधन करण्याचे कार्य ग्रामस्थांसाठी केले. प्राचार्य डॉ. शुभांगी लुंगे यांनी सात दिवसीय शिबीरात झालेली कामे. याबद्दल समाधान व्यक्त करून ग्रामस्थांकडुन असाच प्रतिसाद मिळाल्यास पुढील दोन वर्ष शिबीर घेण्यासाठी विचार करू असे मत मांडले. सदर कार्यक्रमास कार्यक्रम अधिकारी डॉ. चंद्रभान खंगारे, डॉ. दिवाकर कुमरे, डॉ. सुरेश मिममिले, डॉ. प्रिति दवे, डॉ. रागीनी मोटघरे, प्रा. हेमंत वरघने, डॉ. गजानन बन्सोड, डॉ. सुदर्शन खापर्डे, गजु सिडाम रतिराम वांढरे, गणेश येरमे, सरपंच सौ. शोभा कोयनाडे, अंगणवाडी सेवीका मा. इंद्रायनी रामटेके, संगीता काळयेंगे, रेखा गणविर, अविनाश गणतिर, किशोर गभणे बहुसंख्यने ग्रामस्थ व सर्व शिबीरार्थी यांच्या उपस्थितीत ग्रामिण समाजकार्य श्रम संस्कार विशेष शिबीराचा समारोपीय कार्यक्रम पार पडला.
चिमूर : दिनांक ३१ जानेवारी बुधवारला सायंकाळी ६ः १० वाजेच्या सुमारात चिमुर उपक्षेत्रातील कर्मचारी आर. मेश्राम, क्षेत्र सहाय्यक चिमूर, ए. एम. मेश्राम, वनरक्षक चिमुर, कु. एल. बी. बोनगीरवार, वनरक्षक झरी व इतर मजुरासह कक्ष चिमूर बिट क्रमांक 368 मध्ये गस्तीवर असतांना जंगलात वाहनाचा आवाज आला असता खात्री करण्यासाठी गेले असता वनक्षेत्रातील नाल्यावर JCB ने रेम्प तयार करतांना आढळले, त्यांना विचारणा केली असता रेती काढण्यासाठी रैम्प तयार करीत आहो असे सांगितले.
सदर प्रकरणाची माहीती के. बी. देऊरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) यांना दिली असता ते तात्काळ घटनास्थळी हजर झाले. त्यानंत्तर अवैधरित्या वनक्षेत्रात उत्खनन करणारे JCB मशीन जप्त करुन वनपरिक्षेत्र कार्यालयात येथे आणुन भारतीय वनअधिनियम 1927 चे कलम 33(1), अ, ब, 41 व 42 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे
सदर कार्यवाही मा. उपवनसंरक्षक, ब्रहपुरी वनविभाग, ब्रम्हपुरी, सुनिल हजारे, सहाय्यक वनसंरक्षक (तदू), ब्रम्हपुरी वनविभाग, ब्रम्हपुरी के. बी. देऊरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून जप्त कार्यवाहीत आर. डी. मेश्राम, क्षेत्र सहाय्यक, चिमूर यु, बी, लोखंडे, क्षेत्र सहाय्यक, मुरपार आर. डी. नैताम, वनपाल (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) खडसंगी (चिमुर), ए. पी. पोटे, वनरक्षक (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) खडसंगी (चिमुर) आर. बो केदार, वनरक्षक नियतक्षेत्र मान्सुली ए. एम. मेश्राम, बनरक्षक नियतक्षेत्र चिमुर आर. डब्लू हजारे, वनरक्षक नियतक्षेत्र गदगाव, कु एल. बी. बोनगीरवार, वनरक्षक नियतक्षेत्र झरी, तसेच अविनाश डफ, विनोद श्रीरामे व रविंद्र नन्नावरे यांनी सहकार्य केले
Breking news चिमूर तालुक्यातील पिपर्डा गावातील माणिक चूनारकर वय ५३ ठार तर मोरेश्वर चुनारकार वय ३२ गंभीर जखमी झाले आहे प्रास्त माहीती नुसार माणीक चुनारकर व मोरेश्वर चुनारकर है नात्याने काका पुतणे आहे
चिमूर मध्ये प्लाटच्या विक्रीच्या कामासाठी गेले होते
परत गावाला जात असताना शुक्रवार दिनाक १९ जानेवारी रात्रौ ८ः ३० सुमारात विहीरगाव फाट्याजवळ जंगली डुकराच्या सरीने दुचाकी गाडीला धडक दिली माणिक चुनारकार है जागीच गतप्राण झाले तर मोरेश्वर चुनारकार गंभीर जखमी असून या मार्गानी येणार्या लोकांनीं पोलीसाना फोन वर माहीती दिली पोलिस हवालदार विलास निमगडे, प्रविण तिरनकर , पोलिस झिलपे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचणामा केला .प्रेत उत्तरीय तपासनी साठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. दोन दिवसांपूर्वी पिपर्डा गावात आत्महत्या अपघात अशा दुःखत दोन घटना घडल्या आहे यामुळे चुनारकार परिवारात गावात शोकाकूल वातावरण आहे आत्महत्तेचे कारण अजुन स्पस्ट झाले नसुन पुढील तपास सुरु आहे.
चिमूर येथील जिजाऊ नागरी पतसंस्था सभागृहात राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्य मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. संजय पिठाडे यांनी राजमाता जिजाऊ बापत मार्गदर्शन केले. सर्व उपस्थितांनी जिजाऊच्या प्रतिमेस हारार्पण व फुले बाहुन जिजाऊ वंदना घेवुन कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी संस्थचे अध्यक्ष ग्रंथमित्र सुभाष शेषकर, सचिव रामभाऊ खडसिंगे, लोन अध्यक्ष डॉ. संजय पिठाडे, शाखा व्यवस्थापक मिलिंद जांभुळे, सहाय्यक शाखा व्यवस्थापक शुभम भुजे, रुपाली राणे, संचालक मंगलाताई वेदी, सपना गंपावार, डॉ. खानेकर, डॉ. पोर्णिमा खानेकर, विठ्ठल धोटे, सी, भावना पाहुणे, लिना कोराम, कोकीळा दुधनकर आदी उपस्थित होते. राजमाता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन करून जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली आहे.
चिमुर तालुक्यातील नेरी येथील पेठ विभागातील श्री पंढरीनाथ देवस्थान पेठ विभाग तथा समस्त ग्रामवासीय जनतेच्या वतीने संगीतमय श्रीराम चरीत मानस ज्ञानयज्ञ सत्संग सप्ताहाचे गुरुवार दि ४ जानेवारी २०२४ ते गुरूवार दि ११ जाने २०२४ पर्यंत या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते .कथा प्रवक्ता म्हणून सुश्री स्नेहगंगाश्रीजी श्रृंगारे (आळंदीकर) जि. अमरावती ह्या आहे.
४ जानेवारी ला घटस्थापना करुन सप्ताहाची सुरवात करण्यात आली त्यानंतर दररोज सकाळी ६ ते ६.३० वाजेपर्यंत सामुदायिक ध्यान, सकाळी ८ वा. गावातील प्रत्येक वार्डातुन रामधुन काढण्यात आली.
सायंकाळी ६ ते ६.३० पर्यंत सामुदायिक प्रार्थना, सायंकाळी ७ ते ८.३० पर्यंत हरिपाठ हरीओम बाल हरिपाठ मंडळ हिवरा- हिवरी हेमंत कुबडे आणि संच ता. उमरेड जि नागपूर यांचे
विशेष आकर्षण हभप नामदेव अलोने महाराज यांचे भारुड होते
आणि सायंकाळी ९ ते ११.३० वाजेपर्यंत सुश्री स्नेहगंगाश्रीजी श्रृंगारे ( आळंदीकर) जि. अमरावती यांचे अम्रुतमय वाणीतुन प्रवचनाचा लाभ भाविक भक्त उपस्थित घेत होते
या सप्ताहाची सांगता दि ११ जानेवारी रोज गुरवारला दु. १२ ते ४ पर्यंत गोपाल काल्याचे कीर्तनाने सुश्री -- स्नेहगंगाश्रीजी श्रृंगारे (आळंदीकर) जि अमरावती यांच्या अम्रुतमय वाणीने होणार आहे तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम सायंकाळी ५ वा सुरू होणार आहे
या सप्ताहाचे समारोपीय कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून सौ रेखा पिसे सरपंच ग्रा. पं नेरी, आ.बंटी भांगडीया विधानसभा क्षेत्र, मंगेश चांदेकर अध्यक्ष व्यापारी युनियन नेरी, दादाराव पिसे अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ नेरी, रूपचंद चौधरी अध्यक्ष शंकरजी देवस्थान नेरी, अशोक लांजेकर अध्यक्ष जगन्नाथ बाबा मंदीर नेरी, प्रा. राम राऊत सर ग्रामगीता चार्य नेरी, कमलाकर लोणकर सामाजिक कार्यकर्ते नेरी यांच्या व समस्त गाववासीयांच्या उपस्थितीत या सप्ताहाचा समारोप गोपाल काला व महाप्रसादाने होणार आहे तरी नेरी व समस्त जनतेनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन पंढरीनाथ देवस्थान कमिटीच्या वतीने तथा गाववासीयांकडुन करण्यात येत आहे.